२०१९ विश्वचषकात खेळाडूंचे झाले नाही एवढे होतेय या व्यक्तीचे कौतुक

मॅचेस्टर। शनिवारी(22 जून)  2019 विश्वचषकातील 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात पार पडला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेला हा सामना न्यूझीलंडने 5 धावांनी जिंकला आणि या विश्वचषकातील पाचवा विजय मिळवला.

या सामन्यात विंडीजला विजयासाठी 7 चेंडूत 6 धावांची गरज होती. तर न्यूझीलंडला केवळ 1 विकेटची गरज होती. पण याचवेळी विंडीजकडून तुफानी 101 धावांची शतकी खेळी करणारा कार्लोस ब्रेथवेट षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि विंडीजला सामनाही गमवावा लागला.

याआधी ब्रेथवेटने 48 व्या षटकात मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर तब्बल 3 षटकार आणि 1 चौकारांसह 25 धावा ठोकत विंडीजला सामन्यात पुनरागमन करुन दिले होते. पण अखेर त्याचे प्रयत्न विंडीजला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही ब्रेथवेटचे कौतुक करताना त्याला सहानुभूती दिली.

सामन्याच्या शेवटच्या 10 मिनिटात घडलेला हा थरार आयसीसीने एका व्हि़डिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या भावना सुरेखरितीने टिपल्या आहेत.

या सामन्यातील शेवटच्या 10 मिनिटामध्ये न्यूझीलंड आणि विंडीज या दोन्ही संघाच्या चाहत्यांनी आनंद आणि निराशा अशा दोन्ही भावनांचा अनुभव घेतला. या सर्व भावना या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

याबरोबरच या 10 मिनिटांचा थरार न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आणि विंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी समालोचनातून चाहत्यांच्या समोर उभा केला. सामन्यानंतर त्यांच्या समालोचनाचेही मोठे कौतुक झाले.

पण सामन्यातील थरार, प्रेक्षकांच्या भावना आणि बिशन, मॅक्यूलमचे समालोचन हे सर्व एकत्रितपणे करुन एक सुरेख व्हिडिओ ज्याने तयार केला त्या डेल स्टॅनक्लिफ या व्यक्तीचेही प्रचंड कौतुक होत आहे. त्याने केलेला हा व्हिडिओ अनेक दिग्गजांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे. डेल हा आयसीसीसाठी शॉर्ट फॉर्म-कटेंट प्रोड्यूसर म्हणून काम पाहतो.

डेल स्टॅनक्लिफचे सोशल मीडियावर झालेले कौतुक – 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत केन विलियम्सनने केली रोहित-धवनच्या विक्रमाची बरोबरी

विराट कोहलीला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा, जाणून घ्या कारण

३२ वर्षांनंतर असा पराक्रम करणारा शमी दुसराच भारतीय गोलंदाज