- Advertisement -

कुस्तीमध्ये सुमित मलिकला सुवर्ण तर साक्षी मलिकला कांस्यपदक

0 50

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय कुस्तीपटू सुमित मलिकने 125 किलो वजनी गटात सुवर्ण  तर साक्षी मलिकने महिलांच्या 62 किलो वजनी  गटात कांस्य पदक मिळवले आहे.

अंतिम सामन्यात सुमितचा प्रतिस्पर्धी नायजेरीयाचा सिवीने बोल्टिक हा जखमी असल्याने तो या स्पर्धेतून बाहेर पडला. मागील दोन सामन्यात सुमितने पाकिस्तानच्या तयाब रझाला 10 – 4 ने आणि कॅनडाच्या जारविस कोरेला 6 – 4 ने पराभूत केले होते.

25 वर्षाच्या सुमितने 2017 मध्ये झालेल्या आशियाई आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते.

रियो ऑलम्पिक कांस्य पदक विजेती  साक्षी मलिकने अंतिम सामन्यात न्युझीलंडच्या तायला फोर्डला 6-5 ने पराभूत केले. याआधी  साक्षीचे  सुवर्ण पदकाचे स्वप्न नायजेरीयाच्या अमिनात अडेनियीने धूळिस मिळवले.

साक्षीने 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: