राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज 10व्या  दिवशी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे आजच्या दिवसातील सहावे सुवर्णपदक होते.

विनेश फोगटने तिची प्रतिस्पर्धी कॅनडाच्या जेसिका मॅकडोनाॅल्डचा 13-3 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

विनेश फोगटने सामन्याच्या सुरुवातीपासुनच सामन्यावर मजबुत पकड बनवली होती. तिने सामन्याच्या सुरुवातीलाच 4 गुण मिळवत  जेसिका मॅकडोनाॅल्डवर दबाब बनवण्याचा प्रयत्न केला. तिने पुढचा डाव खेळत आणखी 4 गुण प्राप्त केले.

त्याचवेळी  जेसिका मॅकडोनाॅल्डने  देखील तीन गुण मिळवले; पण विनेश फोगटने तिला सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही. विनेश फोगटने दुसऱ्या फेरीत 10 अंक मिळवले व त्यानंतर पंचानी तिला विजयी म्हणुन घोषित केले.