हा माजी खेळाडू म्हणतो धोनीपेक्षा वृद्धिमान सहा चांगला विकेटकीपर

मुंबई । भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठे वक्तव्य करताना एमएस धोनीपेक्षा वृद्धिमान सहा हा चांगला विकेटकीपर असल्याचे म्हटले आहे. याबरोबर धोनीला संघात का स्थान देण्यात आले आहे याचेही कारण गांगुलीने स्पष्ट केले.

” मला वाटते धोनी २०१९चा विश्वचषक खेळेल. धोनीसाठी चांगली गोष्ट ही आहे की विराटला तो संघात हवा आहे. धोनी आता ३६ वर्षांचा आहे आणि पाकिस्तानविरुद्ध २००४ साली खेळलेल्या धोनीसारखा तो आक्रमक नाही. परंतु तो एक वेगळा खेळाडू आहे. कोहलीला तो संघात केवळ यष्टीरक्षक म्हणून नाही तर एक नेता म्हणून देखील हवा आहे. त्याच्याकडे यष्टीमागून नेतृत्व करायचे गुण आहेत. ” गांगुली म्हणतो.

सहा आणि धोनीबद्दल बोलताना गांगुली म्हणतो. “धोनी एक अपारंपरिक यष्टिरक्षक आहे. तुम्हाला यश हवं असेल तर तुम्ही वेगळं असणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे ते आहे. तरीही आपण वृद्धिमान सहाकडे लक्ष दिले पाहिजे. तो धोनीपेक्षा चांगला यष्टीरक्षक आहे. तो देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. तो भारतासाठी ६ किंवा ७ क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. “

आजपासून भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिकेला सुरुवात होत असून धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे नक्की लक्ष असणार आहे.