वृद्धिमान सहाने ट्विट केलेल्या गमतीशीर फोटोवर स्टीव्ह स्मिथने दिली अशी प्रतिक्रिया…

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथबरोबरचा एक गमतीशीर फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोवर स्मिथनेही प्रतिक्रिया दिली आहे.

सहाने शेअर केलेला हा फोटो 2017 मधील आॅस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यानचा आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान रविंद्र जडेजाने टाकलेला एक चेंडू आॅफसाईड लेगला वळाला आणि तो स्मिथच्या पायांमध्ये आडकला.

त्यावेळी सहाने त्याच्या पायामधला चेंडू झेल पकडण्याचा मजेशीर प्रयत्न केला होता. सहाच्या या कृतीवर त्यावेळी पंचांना सुद्धा हासू आवरले नव्हते.

या क्षणाचा फोटो सहाने शेअर केला असून त्याने त्यावर विचारले आहे, ‘कितीजणांना स्मिथबरोबरची ही घटना लक्षात आहे. सहाच्या या फोटोला स्मिथनेही हास्याची स्माईलीची प्रतिक्रिया दिली आहे.

2017 ला या झालेल्या या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता.

सध्या सहा दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

तसेच स्मिथवर मार्चमध्ये झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी क्रिकेट आॅस्ट्रलियाकडून बंदी घालण्यात आली आहे.

तो सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. परंतू यातूनही त्याने दुखापतीच्या कारणाने माघार घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

युएस ओपन: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

अॅलिस्टर कूकच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ