दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू म्हणतो ‘यारों का कोई ठिकाना नहीं होता’

क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने गुरुवारी इंस्टाग्रामवर राजस्थानमधील अल्वार पॅलेसच्या येथील फोटो शेअर केला आहे.

या फोटोला जागेचा टॅग(लोकेशन टॅग) ऱ्होड्सने ‘यारों का कोई ठिकाना नहीं होता’ असा हिंदीमध्ये दिला आहे.

त्याचबरोबर त्याने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की अल्वर पॅलेसच्या आसपास फिरताना थंडगार पाऊस आनंद देत होता.” याबरोबरच त्याने या ठिकाणचे अन्य फोटोही शेअर केले आहेत.

तो 28 जुलैला भारतात पर्यटन करण्यासाठी कुटुंबासमवेत आला आहे.

तसेच ऱ्होड्स हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 52 कसोटीत 35.66 च्या सरासरीने 2532 धावा केल्या आहेत. तर 245 वनडे सामन्यात 35.11 च्या सरासरीने 5935 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे ऱ्होड्सच्या मुलीचा जन्मही भारतात झाला असल्याने त्याने तीचे नावही इंडिया असे ठेवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

११ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

पहिल्या ६ षटकांतच भारताला दोन मोठे धक्के