दक्षिण आफ्रिकेचे ७ खेळाडू तंबूत, धोनीला विक्रमसाठी एका विकेटची गरज

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने ११० धावांवर ७ विकेट्स गमावल्या आहेत. ३० षटकांत ७ बाद ११० अशी आफ्रिकेची अवस्था असून त्यांचे सर्व प्रमुख खेळाडू तंबूत परतले आहेत.

रिस्ट स्पिनर युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव यांनी आफ्रिकेचे प्रत्येकी ३ फलंदाज तंबूत धाडले असून भुवनेश्वर कुमारलाही एक विकेट मिळाली आहे.

कोणत्याही अनुभव खेळाडूंसह अननुभवी खेळाडूंना फलंदाजीत चमक दाखवता आली नाही.

बाद झालेल्या फलंदाजांमध्ये हाशिम अमला (२३), डिकॉक (२०),कर्णधार एडिन मार्करम (८), डेविड मिलर (०), डुमिनी(२५), खाया झोनदो(२५) आणि कागिसो रबाडा(१) यांचा समावेश आहे.

या सामन्यात जर धोनीने अजून एक झेल घेतला तयार वनडेत ४०० बळी यष्टीपाठीमागे घेणारा तो चौथा यष्टिरक्षक ठरणार आहे.