15व्या आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत यार्डी, टिएटो संघांचा विजय

पुणे: आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत यार्डी संघाने सिटी संघाचा तर टिएटो  संघाने सिनरझीप संघाचा पराभव करत विजय संपादन केला.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात अमित राडकरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यार्डी संघाने सिटी संघाचा 9 गडी राखुन दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मोद दवंडे व पंकज लालगुडे यांच्या अचूक गोलंदाजीने सिटी संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 101 धावांत रोखला. 101 धावांचे लक्ष अमित राडकरच्या 53 धावांसह यार्डी संघाने 14 षटकात  केवळ 1 गडी गमावत 102 धावांसह सहज पुर्ण केले. प्रतिक शिंदे नाबाद 28 धावा करून अमितला सुरेख साथ दिली. 46 चेंडूत 53 धावा करणारा अमित राडकर सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत चेतन पिंगळेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर टिएटो  संघाने सिनरझीप संघाचा 34 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना गणेश अंब्रेच्या 36, अंकित जैनच्या नाबाद 31 व चेतन पिंगळेच्या 29 धावांसह टिएटो संघाने 20 षटकात 7 बाद 154 धावा केल्या. 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विक्रम माळीच्या आक्रमक गोलंदाजीपुढे सिनरझीप संघ 20 षटकात 8 बाद 120 धावांत गारद झाला. चेतन पिंगळे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी  

सिटी- 20 षटकात सर्वबाद 101 धावा(अमित पांडे 25(17), रोहित उपाध्याय 21(19), फाजलीन अहमद 23(19), प्रमोद दवंडे 3-16, पंकज लालगुडे 2-15) पराभूत वि यार्डी – 14 षटकात 1 बाद 102 धावा(अमित राडकर 53(46), प्रतिक शिंदे नाबाद 28(29), फजलीन अहमद 1-15) सामनावीर- अमित राडकर

यार्डी संघाने 9 गडी राखुन सामना जिंकला.

 

टिएटो- 20 षटकात 7 बाद 154 धावा(गणेश अंब्रे 36(30), अंकित जैन नाबाद 31(30), चेतन पिंगळे 29(15), पंकज इसरका 2-28, रामेश्वर केंद्रे 2-15) वि.वि सिनरझीप- 20 षटकात 8 बाद 120 धावा(जगदीप पठारे 37(40), प्रसाद नागमणी 21(20), विक्रम माळी 2-23) सामनावीर- चेतन पिंगळे

टिएटो  संघाने 34 धावांनी सामना जिंकला.