याया टोरे आणि त्याचा सहकारी करणार मँचेस्टर हल्ल्याच्या बळींना १,००,००० युरोंची मदत

मँचेस्टर येथे सुरु असलेल्या आरियाना ग्रँड हिच्या गाण्याच्या कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या दहशतवादी हल्लयात तब्बल २० जणांचा बळी गेला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मदत म्हणून मँचेस्टर सिटी फ़ुटबाँल क्लबचा मिडफिल्डर टोरे आणि त्याचा एजन्ट दिमित्री सीलूक प्रत्येकी ५०,००० युरो म्हणजेच तब्बल ३६ लाख रुपये देणार आहेत. एकूण ७२ लाख रुपये देण्याचे त्यांनी ठरवले आहे.

याया हा मूळ ‘कोटे डी आइवर’ म्हणजे आइवरी कोस्टचा आहे, पण माणुसकी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पडतोय असे तो म्हणाला. फुटबॉल चाहत्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप काही दिले आहे आता परतफेड करायची ही वेळ आहे.

२१,००० चाहत्यांमध्ये मँचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गार्डियोला यांची पत्नी आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या पण ते सुखरूप बाहेर पडल्या.

टीम महा स्पोर्ट्सकडून मँचेस्टर हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व नागरिकांना आदरांजली.