माझ्या जीवनात मित्र कमी आणि शत्रूच जास्त झाले आहेत- गंभीर

दिल्ली। आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेला रणजी ट्रॉफीचा सामना अनिर्णीत राहिला. हा माजी कर्णधार गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. या सामन्यात त्याने पहिल्या डावात शानदार शतकी खेळी केली.

काही दिवसांपूर्वीच गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकटेमधून निवृत्ती घेतली असून त्याचा हा शेवटचा सामना होता. यामध्ये त्याने 185 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 112 धावा केल्या. मात्र यादरम्यान त्याने असे काही विधान केले जे एेकून अनेकांना धक्काच बसला.

गंभीर हा नेहमीच त्याच्या रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. म्हणूनच त्याने मी माझ्या कारकीर्दीत मित्र कमी शत्रू अधिक बनवले आहे असे म्हटले आहे.

“क्रिकेटमध्ये काही चुका होतात त्या चुका ज्यांच्याकडून घडल्या त्यांना सांगणे योग्य समजले जात नाही. तसेच आपण कधी कधी खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्या मला बरोबर वाटत नाही”, असे गंभीरने म्हटले आहे.

“मला कोणत्याच गोष्टीचा खेद नसून मी रात्री शांतपणे झोपू शकतो”, असेही गंभीरने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आफ्रिदीबरोबरचे भांडण, शेन वॉटसन आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबरचे भांडण तर आयपीएलमधले विराट कोहली आणि त्याचे भांडण असे अनेक प्रसंग लक्षात राहतील.

तसेच 2017मध्ये गंभीरचे दिल्लीचे प्रशिक्षक केपी भास्कर यांच्याशी शाब्दीक चकमक झाली होती. दिल्लीचे संघ निवड अधिकारी चेतन चौहान यांच्यासोबरही त्याचे नवदीप सैनीवरून वाद झाले आहेत. यावेळी त्याचे असे मत होते की, जर संघ रणजी ट्रॉफीचे सलग तीन सामने जिंकला आहे तरीही संघाच्या अधिकाऱ्यांना कनिष्ठ गटातील क्लब क्रिकेटरला संघात का घ्यायचे होते.

“ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात त्या समोर आणणे जरूरी आहे”, असेही गंभीर म्हणाला. त्याला त्याचा वादाचा कारकिर्दीवर काय परिणाम होईल याची पर्वा नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार

गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका

Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला