विम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम

१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने काल आणखी एका खास विश्वविक्रमाला गवसणी घातली. काल हा खेळाडूने विक्रमी ५०व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

याबरोबर सर्वाधिक ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचं अर्धशतक पूर्ण केलं. फेडरर नंतर सर्वाधिक उपांत्यपूर्व फेरी खेळण्याचा विश्वविक्रम जिमी कॉनर्स यांच्या नावावर आहे. त्यांनी ४१ उपांत्यपूर्व फेरीत खेळल्या आहेत.

सार्वधिक उपांत्यपूर्व फेरी खेळणारे खेळाडू
५०- रॉजर फेडरर
४१- जिमी कॉनर्स
३८- नोवाक जोकोविच
३६- आंद्रे अगासी
३४- इवान लेंडल