एमएसएलटीए योनेक्स सनराईज टेनिस स्पर्धेत सोनल पाटील, प्रणव गाडगीळ, रोहन फुले यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0 84

पुणे । मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात सोनल पाटील,रुमा गाईकैवारी यांनी तर, मुलांच्या गटात मानस धामणे, प्रणव गाडगीळ, रोहन फुले या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट व मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए), मुकुंदनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात कोल्हापूरच्या बिगरमानांकित सोनल पाटील हिने अव्वल मानांकित ख़ुशी शर्माचा टायब्रेकमध्ये1-6, 6-2, 7-6(4)असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.

सहाव्या मानांकित अन्या जेकबने स्वरा काटकरचे आव्हान 6-3, 6-0असे संपुष्टात आणले. सिया देशमुखने आदिती लाखेला 6-2, 6-1असे नमविले. रुमा गाईकैवारीने आठव्या मानांकित ख़ुशी किंगरचा 6-1, 6-3असा सनसनाटी निकालाची नोंद केली.

अग्रिमा तिवारीने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या समीक्षा श्रॉफचा टायब्रेकमध्ये 7-6(10-8), 6-3असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुलांच्या गटात बिगरमानांकित प्रणव गाडगीळ याने अव्वल मानांकित सिद्धार्थ जडलीचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(3)असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पुण्याच्या मानस धामणे याने चौथ्या मानांकित आदित्य जावळेचा 7-5, 6-3असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

रोहन फुलेने सातव्या मानांकित इंद्रजीत बोराडेवर 6-1, 7-5असा सहज विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: दुसरी फेरी: 16वर्षाखालील मुली:
सोनल पाटील वि.वि.ख़ुशी शर्मा (1)1-6, 6-2, 7-6(4);
अन्या जेकब(6)वि.वि.स्वरा काटकर 6-3, 6-0;
सिया देशमुख वि.वि.आदिती लाखे 6-2, 6-1;
रुमा गाईकैवारी वि.वि.ख़ुशी किंगर(8) 6-1, 6-3;
सायना देशपांडे(5)वि.वि.मयुखी सेनगुप्ता 6-1, 6-0;
मधुरीमा सावंत(3)वि.वि.यश देसाई 6-3, 6-4;
अग्रिमा तिवारी वि.वि.समीक्षा श्रॉफ 7-6(10-8), 6-3;
लोलाक्षी कांकरिया(2)वि.वि.संचिता नगरकर 6-0, 6-0;

16वर्षाखालील मुले:
प्रणव गाडगीळ वि.वि.सिद्धार्थ जडली(1)6-4, 7-6(3);
प्रसाद इंगळे(5)वि.वि.अभिरव पाटणकर 6-0, 6-4;
दक्ष अगरवाल(3)वि.वि.अनमोल पुरोहित 6-0, 6-0;
मानस धामणे वि.वि.आदित्य जावळे(4)7-5, 6-3;
अनर्घ गांगुली(6) वि.वि.अर्णव ओरुगांती 6-2, 6-2;
यशराज दळवी(2) वि.वि.वेद पवार 6-1, 6-0;
रोहन फुले वि.वि.इंद्रजीत बोराडे(7) 6-1, 7-5;
ओंकार अग्निहोत्री(8)वि.वि.अंशूल सातव 1-6, 6-3, 6-3.

Comments
Loading...
%d bloggers like this: