एमएसएलटीए योनेक्स सनराईज टेनिस स्पर्धेत अत्रेय राव, अभिराम कंडतची आगेकूच

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत अत्रेय राव, अभिराम कंडत, संवेद देशमाने, आर्यन कोटस्थाने, राघव अमीन, ईशान देगंवार व ईशान नाथन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अत्रेय राव याने आदित्य भटवेराचा टायब्रेकमध्ये 9-8(8-6)असा पराभव करून आगेकूच केली.

अभिराम कंडतने आदित्य पवारचा 9-3असा तर, संवेद देशमाने याने अथर्व बिराजदारचा 9-6असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. ईशान देगंवार व ईशान नाथन यांनी अनुक्रमे आरिन माळी व दक्ष जालीवाला यांचा 9-1अशा सारख्याच फरकाने पराभव केला. आर्यन कोटस्थाने याने आदित्य जहागीरदारवर 9-0असा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
14वर्षाखालील मुले:
अभिराम कंडत वि.वि.आदित्य पवार 9-3;
संवेद देशमाने वि.वि.अथर्व बिराजदार 9-6;
राघव अमीन वि.वि.अनिश रांजळकर 9-7;
आदित्य तलाठी वि.वि.सोहम सावंत 9-0;
ईशान देगंवार वि.वि.आरिन माळी 9-1;
ईशान नाथन वि.वि.दक्ष जालीवाला 9-1;
आर्यन कोटस्थाने वि.वि.आदित्य जहागीरदार 9-0;
अत्रेय राव वि.वि.आदित्य भटवेरा 9-8(8-6).

अनमोल नागपुरे वि.वि यश मस्कर 9-0;

श्रेयश कुमार वि.वि ऋषीकेश बर्वे 9-2.