१६ वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत पार्थ भोईटे, मधुरिमा सावंतचे संघर्षपूर्ण विजय

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पार्थ भोईटे, कुणाल पवार, अयान तेजाबवाला, ध्रुव सुरेश यांनी तर, मुलींच्या गटात व्योमा भास्कर, जिया परेरा, सायना देशपांडे, मधुरिमा सावंत, स्वरदा परब या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात पार्थ भोईटे याने सोहम कलगेचा टायब्रेकमध्ये 9-8(4)असा पराभव केला. अयान तेजाबवाला याने विनीत मुटयालाचा 9-7असा संघर्षपूर्ण पराभव केला. कुणाल पवारने नमित मिश्राला 9-4असे नमविले. वेद कुलकर्णीने आदित्य शिंदेचा 9-0असा सहज पराभव केला.

मुलींच्या गटात जिया परेरा हिने ख़ुशी रंगधोळचा टायब्रेकमध्ये 9-8(5)असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. मधुरिमा सावंतने परी चव्हाणचे आव्हान 9-8(4)असे मोडीत काढले. रिया भोसलेने अन्या जेकबचा 9-3 असा तर, स्वरदा परबने हर्षिता बांगेराचा 9-4असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: 16 वर्षाखालील मुले: कुणाल पवार वि.वि.नमित मिश्रा 9-4; पार्थ भोईटे वि.वि.सोहम कलगे 9-8(4); ध्रुव सुरेश वि.वि.सार्थक कलगे 9-1; प्रणव हेगरे वि.वि.अथर्व साळुंखेपाटील 9-5; आयुष हिंदळेकर वि.वि.अथर्व पाटील 9-4; अयान तेजाबवाला वि.वि.विनीत मुटयाला 9-7; वेद कुलकर्णी वि.वि.आदित्य शिंदे 9-0;

16 वर्षाखालील मुली: व्योमा भास्कर वि.वि.इनिका रेड्डी 9-4; जिया परेरा वि.वि.ख़ुशी रंगधोळ 9-8(5); लाक्षण्या विश्वनाथ वि.वि.सोनल पाटील 9-4; सायना देशपांडे वि.वि.हर्षाली मांडवकर 9-5; रेश्मा मारूरी वि.वि.समीक्षा श्रॉफ 9-3; मैथिली मोटे वि.वि.संजीवनी कुतवळ 9-2; मधुरिमा सावंत वि.वि.परी चव्हाण 9-8(4); रिया भोसले वि.वि.अन्या जेकब 9-3; स्वरदा परब वि.वि.हर्षिता बांगेरा 9-4; सुहिता मारूरी वि.वि.निहारिका देशमुख 9-1.