पुजारा-रुटच्या संघावर ४५ वर्षांतील सर्वात मोठी नामुष्की!

चेम्सफोर्ड | काऊंटी क्रिकेटमध्ये इसेक्स विरुद्ध याॅर्कशायर सामन्यात आज पहिल्या दिवशी याॅर्कशायरचा संपुर्ण डाव ५० धावांत संपुष्टात आला.

विशेष म्हणजे याॅर्कशायरकडून कसोटी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा, इंग्लंडचा कर्णधार जो रुट तसेच जाॅनी ब्रेर्स्टो हे खेळत आहेत.

आज याॅर्कशायरने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

सॅम्युएल कुक आणि पीटर सिडल यांच्या गोलंदाजीसमोर त्यांचा संपुर्ण संघ ५० धावांत संपुष्टात आला.

सॅम्युएल कुकने ९ षटकांत ५ तर पीटर सिडलने ३.४ षटकांत ४  विकेट्स घेतल्या.

चेतेश्वर पुजारा (९), इंग्लंडचा कर्णधार जो रुट(०) तर जाॅनी ब्रेर्स्टो (७) धावा करुन तंबुत परतले.

केवळ कर्णधार गॅरी बॅलंन्सला दुहेरी धावसंख्या उभारता आली. त्याने ४१ चेंडूत २२ धावा केल्या.

१९७३ पासून ते कधीही एवढ्या कमी धावसंख्येवर सर्वबाद झाले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या –