सचिनने दिल्या सेहवागला वाढदिवसाच्या ‘उलटया’ शुभेच्छा !

वीरेंद्र सेहवागला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा की त्याचा आवडता क्रिकेटपटू कोणता? आणि सेहवागनेही तेवढ्याच वेळा त्याचे उत्तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असे दिले.

काही दिवसांपूर्वीच मास्टर ब्लास्टरने सेहवागला कार भेट दिली होती. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच या दोन खेळाडूंमध्ये घनिष्ट संबंध आहेत. असे असले तरी मैदानावर अनुभवी आणि दिग्गज खेळाडू सचिन सेहवागला जे सांगायचा त्याच्या सेहवाग बरोबर उलट करत असे.

आज सेहवागच्या वाढदिवशी मास्टर ब्लास्टरने मौका पाहून चौका मारला आहे. आज सचिनने सेहवागला ट्विटरवर चक्क इंग्रजी अक्षर उलटी लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” वीरू तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. येणारे वर्ष तुला चांगले जावो. मी मैदानात जे काही सांगायचो त्याच्या अगदी उलट तू करायचा. म्हणून मी येथे असच करत आहे. “

सचिनचा ट्विट: .ǝɯ ɯoɹɟ ǝuo s,ǝɹǝɥ os ˙?pןǝıɟ uo noʎ pןoʇ ǝʌɐɥ ı ʇɐɥʍ ɟo ɐʇןn ǝuop sʎɐʍןɐ ǝʌ,noʎ ˙ɹɐǝʎ ʍǝu ǝɥʇ oʇ ʇɹɐʇs ʇɐǝɹƃ ɐ ǝʌɐɥ ¡nɹıʌ ‘ʎɐpɥʇɹıq ʎddɐɥ