रोहित शर्मा म्हणतो, हा खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, पहा व्हिडिओ

2019 विश्वचषकात रविवारी(16 जून) भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध 89 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

हा सामना संपल्यानंतर भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने ‘चहल टीव्ही’ या शोमध्ये रोहितची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान रोहितने चहलला गमतीने तो कर्णधार होऊ शकतो असे म्हटले आहे.

या मुलाखतीत चलहने रोहितला त्याची खेळी कशी उभारली असे विचारले, त्यावर रोहित म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये खेळपट्टी कशीही असू दे तूम्हाला चेंडू कसा येत आहे हे समजायला 5-6 षटके वेळ द्यावा लागतो.’

‘आपल्या संघातील खेळाडूंना स्ट्रोक्स खेळायला आवडतात. त्यामुळे सुरुवातीला समदारीने खेळणे गरजेचे आहे आणि मागील दोन सामन्यात असेच केले आहे. सुरुवातीला आमची योजना नवीन चेंडूवर सावध खेळणे अशी होती.’

याबरोबरच रोहितने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचे कौतुक करताना म्हटले आहे की ‘नक्कीच, कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. पण मी त्याचबरोबर तूलापण श्रेय देईल, कारण तू एन्ड बदलण्याचे सुचविले. त्यानंतर मी कर्णधार विराट कोहलीशी बोललो आणि आम्ही तूमचे एन्ड बदलले. यानंतर कुलदीपचे चेंडू चांगले ड्रीफ्ट होत होते. तू कर्णधार बनू शकतो.’

पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात रोहितने 113 चेंडूत 140 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 24 वे शतक आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्ध शतक करणाऱ्या शाकिबने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकत रचला विश्वविक्रम

तो खेळाडू सर्फराज अहमदला म्हणाला ‘ब्रेनलेस कॅप्टन’

टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या खेळाडूंचा होतो उंदीर, पाकिस्तानी महिलेने व्यक्त केला राग