भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी असे केले केन विलियम्सनचे कौतुक

रविवारी(14 जूलै) लॉर्ड्स मैदानावर 2019 विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. रोमहर्षक ठरलेल्या या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांच्या आधारावर इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली आणि पहिल्यांदाच विश्वविजेतेपद मिळवले.

या सामन्यात न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडनेही शांततेत हा पराभव स्विकारला. त्यामुळे न्यूझीलंड संघाचे आणि कर्णधार केन विलियम्सनचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही विलियम्सनच्या शांत मनोधैर्याचे कौतुक केले आहे.

शास्त्रींनी विलियम्सनचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की ‘ज्याप्रकारे घटना घडल्या त्या पाहता तू जे धैर्य आणि प्रतिष्ठा दाखवली ती शानदार होती. सामन्याच्या 48 तासांनंतरही तूझी असणारी शिष्ठता आणि शांतता कमाल आहे. आम्हाला माहित आहे तूझा एक हात विश्वचषकावर होता.’

तसेच त्यांनी पुढे विलियम्सनच्या पहिल्या नावाचा(केन) उपयोग करुन तू विश्वचषक जिंकू शकत होता आणि त्यासाठी तू पात्रही होता अशा अर्थाचे वाक्य लिहिले आहे.

या सामन्यानंतर विलियम्सनला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या विश्वचषकातील मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. या क्षणाचा फोटोही शास्त्रींनी या ट्विटबरोबर शेअर केला आहे.

विलियम्सनने या विश्वचषकात 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधारही ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकातील इंग्लंडच्या या स्टार खेळाडूला आता कसोटी पदार्पणाचीही संधी

अंतिम सामन्यानंतर सचिन तेंडुलकर केन विलियम्सनला असे म्हणाला…

हे तीन दिग्गज निवडणार टीम इंडियासाठी नवीन कोच?