धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल

अनेकदा खेळाडू शरीर आणि आहाराची काळजी घेण्यासाठी महागड्या गोष्टी वापरताना दिसतात. यासाठी ते अगदी मिनरल वॉटर अर्थात पिण्याचे पाणी देखील महागड्यामहागड्या ब्रँडचे घेतात.आजकाल भारत आणि जगात खेळाडू आणि सेलेब्रिटी हे आपल्या शरीर आणि आहाराबद्दल काहीसे अधिकच जागरूक झालेले दिसतात.

पण याला अपवाद ठरला आहे तो भारताचा कॅप्टन कूल एमएस धोनी. क्रिकफिट या वेबसाईटने दिलेल्या वृत्ताप्रमाणे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या एका सामन्यादरम्यान स्ट्रॅटर्जिक टाईम आऊटच्या वेळी धोनी ‘बेली’ या ब्रँडचे पाणी पिताना दिसून आला आहे. 

बेली’ या ब्रँडची 1 लीटर पाण्याची बाटली फक्त 20 रूपयांना मिळते.  यावरूनच धोनीचा साधेपणाचा अंदाज येतो.  धोनी नेहमीच त्याच्या साधेपणामुळे आणि त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. त्याच्या या स्वभावाचे सर्वांकडून कौतुकही होते.

धोनी सध्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असून तो यावर्षीच्या आयपीएल मोसमात 8 सामन्यात 286 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सध्या पाचव्या स्थानावर आहे.

तो कर्णधार असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या चांगला खेळत आहे. त्यांनी 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभव मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.

याआधी काही महिन्यांपूर्वी विराट कोहली पित असलेल्या पाण्याच्या खर्चाची बरीच चर्चा झाली होती. एव्हियन नावाचे मिनरल पाणी विराट रोज पितो. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे ६०० रुपये किंमत आहे.. भारताच्या या कर्णधाराचा महिन्याचा पिण्याचा पाण्याचा खर्च अंदाजे ३६,००० रुपये एवढा आहे.
विराट कोहली जे पाणी रोज पितो ते फ्रान्सवरून येते. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे किंमत आहे ६०० रुपये. एव्हियन नावाचे मिनरल पाणी विराट रोज पितो. फ्रान्समधील ग्रामीण भागात जे नैसर्गिक झरे आहेत तिथेच हे पाणी मिळते. ह्या पाण्याच्या बाटल्या भारतात मोठ्या आणि छोट्या प्रकारात मिळतात. छोटी बाटली अंदाजे २४० रुपयांना मिळते.

महत्त्वाच्या बातम्या –

Video- कोहली फॅन्सकडून सचिनच्या चाहत्यांना जोरदार प्रतित्तोर

डेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी

भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल

पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…

 धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही