या मुंबईकर फलंदाजाने आज केले वनडे पदार्पण

धरमशाला। येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आज मुंबईच्या श्रेयश अय्यरने आपले आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण केले आहे.

श्रेयश या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. शिखर धवन आणि रोहित शर्मा दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्याने श्रेयशवर भारतीय संघाचा डाव सावरण्याची मोठी जबादारी आज असेल.

श्रेयश अय्यरने याआधी १ नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध टी २० सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. परंतु त्याला पदार्पण केलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत खास काही करता आले नव्हते. त्याने तीन टी २० सामन्यांच्या मालिकेत २९ धावा केल्या होत्या.

तसेच तो १९ वर्षांखालील भारतीय संघाकडूनही खेळला आहे. या बरोबरच सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीतही मुंबईकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत श्रेयसने ४६ सामन्यात ३९८९ धावा केल्या आहेत. नाबाद २०२ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.