गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार

पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठी गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्स संघाच्या कर्णधारपदी 21 वर्षीय युवा सुनील कुमारची निवड झाली आहे.

सुनीलने पाचव्या मोसमात प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्यासाठी हा पदार्पणाचा मोसम चांगलाच फलदायी ठरला. त्याने बचावात 24 सामन्यात 57 गुणांची कमाई केली होती.

नवीन खेळाडूंना संधी देणारा संघ म्हणून गुजरातच्या संघाकडे पाहिले जाते. गुजरातने मागील वर्षीच प्रो कबड्डी स्पर्धेत पदार्पण केले आहे. तसेच त्यांनी मागील वर्षी झालेल्या पाचव्या मोसमाचे उपविजेतेपदही मिळवले आहे.

गुजरातचा घरचा लेग हा 16 ते 22 नोव्हेंबर 2018 दरम्यान अहमदाबादला होणार आहे. तर गुजरात सहाव्या मोसमातील पहिला सामना 9 आॅक्टोबर 2018 ला दबंग दिल्ली विरुद्ध खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात हा दिग्गज करणार तमिळ थलायवाजचे नेतृत्व

आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका