नव्या महिला क्रिकेटपटूंचा आदर्श मिताली आहे सचिन नाही !

0 72

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर स्म्रिती मानधनाने कर्णधार मिताली राजचे महत्व विशद करताना नव्यानेच क्रिकेट खेळणे सुरु करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंसाठी मिताली आदर्श असल्याचं म्हटलं आहे.

“मला नाही वाटत कुणी विचारात असेल की तुमचा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण? मला विश्वास आहे की देशात छोट्या मुलींनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली असेल. ते आदर्श म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे नाही तर मिताली राजकडे पाहत असतील.” असे स्म्रितीने इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाली.

आयपीएलबद्दल बोलताना ती म्हणाली, ” महिलांची आयपीएल ही एक चांगली गोष्ट असेल. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी खेळायला मिळेल. मला विश्वास आहे की बीसीसीआय यावर विचार करेल. “

Comments
Loading...
%d bloggers like this: