टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा शाॅ चौथा सर्वात युवा खेळाडू

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून या सामन्यात १८ वर्ष ३२९ दिवस वय असलेला पृथ्वी शाॅ कसोटी पदार्पण करणारा तो चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

यापुर्वी सचिन तेंडूलकरने वयाच्या १६ वर्ष आणि २०५ दिवसांचा असताना कसोटी पदार्पण केले होते. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सचिनने कराचीला पाकिस्तान संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हा गोलंदाजीत सचिनने पहिल्या डावात १० तर दुसऱ्या डावात १५ धावा दिल्या होत्या तर फलंदाजीत पहिल्या डावात १५ धावा केल्या होत्या.

शाॅचे पदार्पण- 

भारताकडून आजपर्यंत शाॅ सोडून एकूण २९२ खेळाडूंना कसोटीत संधी मिळाली आहे. त्यात यावर्षी जानेवारी महिन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले होते.

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंतने तर पाचव्या कसोटीत हनुमा विहारीने कसोटी पदार्पण केले होते. यातील केवळ रिषभ पंतच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता तर बुमराह आणि विहारीच्या पदार्पणाच्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पहावा लागला होता.

भारताकडून कसोटी पदार्पण करणारा शाॅ हा एकूण २९३वा खेळाडू ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय