रिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना 18 आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत 0-2 असा पिछाडीवर आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 31धावांनी पराभूत व्हावे लागले तर दुसऱ्या कसोटीत 1 डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या तिसऱ्या कसोटीत भारताकडून रिषभ पंत पदार्पण करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सफेद रंगाची जर्सी घालणारा तो केवळ 291वा भारतीय खेळाडू आहे.

भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा पंत हा 5वा तरुण यष्टीरक्षक ठरला आहे. सध्या त्याचे वय 20 वर्ष 318 दिवस आहे.

भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर आहे. त्याने 17 वर्ष आणि 152 दिवसांचा असताना कसोटी पदार्पण केले होते.

रिषभपेक्षा कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम दिनेश कार्तिक (19 वर्ष 155 दिवस), बुधी कुंदरन (20 वर्ष आणि 91 दिवस) आणि अजय रात्रा (20 वर्ष आणि 127) यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल