रिषभ पंतने २१ व्या वर्षी केला हा मोठा कारनामा; बनला रोहित शर्मा नंतरचा दुसराच खेळाडू

चेन्नई। रविवारी(11 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात रिषभ पंत आणि शिखर धवनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली.

पंतने या सामन्यात 38 चेंडूत 58 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील पहिलेच अर्धशतक आहे.

त्यामुळे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम केला तेव्हा त्याचे वय 21 वर्षे आणि 38 दिवस इतके होते.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 20 वर्षे 143 दिवस इतके वय असताना 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 50 धावांची खेळी केली होती.

याबरोबरच रिषभ पंतने एकूण 58 टी20 सामने खेळताना 100 षटकारही मारण्याचा टप्पा पार केला आहे.

सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारे भारतीय खेळाडू

20 वर्षे 143 दिवस – रोहित शर्मा (2007, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध)

21 वर्षे 38 दिवस – रिषभ पंत (2018, विंडीज विरुद्ध)

21 वर्षे 307 दिवस – रॉबीन उथप्पा (2007, पाकिस्तान विरुद्ध)

महत्त्वाच्या बातम्या:

एकही चेंडू न खेळता भारतीय महिलांना मिळाल्या १० धावा, काय आहे कारण?

कर्णधार रोहित शर्मानेही केला विराट कोहली प्रमाणे मोठा पराक्रम

महिला टी२० विश्वचषक: भारतीय महिलांचा पाकिस्तान विरुद्ध शानदार विजय