अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय

भारतीय युवा बॅटमिंटनपटू लक्ष्य सेनने ब्युनोस आयरिस (अर्जेंटिना) येथे सुरू असलेल्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये ऐतिहासिक रौप्य पदक पटकावले आहे. यावेळी त्याला अंतिम फेरीत चीनच्या शिफेंग लीकडून 15-21, 19-21 असा पराभव स्विकारावा लागला.

सेनच्या रौप्य पदकाने भारताचे या स्पर्धेत एकूण आठ पदके झाले आहेत. तसेच तो या स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा दुसराच भारतीय आहे. याआधी अशी कामगिरी एच एस प्रणॉयने 2010ला सिंगापूर येथे झालेल्या युथ ऑलिंपिकमध्ये केली होती.

यावेळी पहिल्या गेममध्ये लीने चांगली सुरूवात करत 14-5 अशी आघाडी घेतली होती. सेनने नंतर सावरत त्याचा नैसर्गिक खेळ करत 13-16 असा फरक कमी केला. मात्र परत लीने त्याची कुरघोडी कायम ठेवत पहिला गेम 17 मिनिंटात आपल्या नावे केला.

17 वर्षीय सेनने दुसऱ्या गेममध्ये त्याचा प्रतिकार सुरू ठेवल्याने त्याला चार गुण मिळवण्यात यश आले. मात्र लीने त्याचा अप्रतिम खेळ करत दुसऱ्या गेममध्येही बाजी मारली.

तसेच भारतीय शूटर मनू भाकेरने या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य असे दोन पदक मिळवले असून दोन पदके जिंकणारी या स्पर्धेतील ती पहिलीच शूटर ठरली आहे. तर भारतीय ज्युदो खेळाडू तबाबी देवी हिने पण या स्पर्धेत दोन पदके मिळवली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

विराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम

शानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील

१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती