Pune: युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजरच्या अंतिम फेरीत

पुणे ।भारताचा दिग्गज टेनिस स्टार युकी भांब्रीने केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्याने स्पेनच्या जागतीक क्रमवारीत 130व्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या मानांकित ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास ६-२, ६-४ असा पराभव केला.

जागतिक क्र.140 असलेल्या भारताच्या युकी भांब्री हा यावर्षी अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. दुसरा उपांत्यफेरीचा सामना रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांच्यात होणार आहे.

त्यामुळे रविवारी अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू पुरुष एकेरीत खेळताना दिसतील.

25 वर्षीय युकीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरासवर आपले वर्चस्व कायम राखले.पहिला सेट ६-२ असा जिंकणाऱ्या युकीने दुसऱ्या सेटमध्येही काहीसा तसाच खेळ करून सामना ६-४ असा जिंकला.

हा सामना १ तास ३९ मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये युकीने २ तर ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरासने ३ बिनतोड सर्विस केल्या.