केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागल, युकी भांब्री यांचा दुस-या फेरीत प्रवेश

पुणे । एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल, युकी भांब्री व एन.विजय सुंदर प्रशांत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या मुख्य फेरीत भारताच्या सुमित नागलने ऑस्ट्रिलियाच्या लुकास मिडलर याचा 7-6(1),6-0 असा टायब्रेकरमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. 

एक तास 55 मिनिट चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केला. सुरूवातीला दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखल्या त्यामुळे बाराव्या गेममध्ये 6-6 अशी बोरबरी झाली. त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. 

सुमितने नेटजवळून आक्रमक खेळी करत हा सेट 7-6(1) असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये सुमितने आपले वर्चस्व कायम राखत मिडलरची दुस-या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-0 असा जिंकत दुस-या फेरीत प्रवेश केला.

भारताच्या तिस-या मानांकीत युकी भांब्री याने  जपानच्या  काईची  उचिडा याचा 6-2, 7-5 असा पराभव करून दिमाखात दुसरी फेरी गाठली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकी याने आक्रमक व चतुराईने खेळ करत उचिडाची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये उचिडाने  युकीची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. 

पण पिछाडीवर असलेल्या युकीने वरचढ खेळ करत उचिडाची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. युकीने उचिडाची 11व्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.

भारताच्या एन.विजय सुंदर प्रशांत याने आर्यन गोवीसचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली.

अव्वल मानांकीत स्लोव्हेनियाच्या कावकीक ब्लाज याने फ्रांसच्या जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स याचा 6-4, 6-4 असा तर दुस-या मानांकीत स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने क्रोटायाच्या बोर्ना गोजो याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट-पहिली फेरी

कावकीक ब्लाज(स्लोव्हेनिया,1) वि.वि जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स(फ्रांस) 6-4, 6-4

ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन,2) वि.वि बोर्ना गोजो (क्रोटाया) 6-2, 6-3

युकी भांब्री(भारत,3) वि.वि काईची उचीडा(जपान) 6-2, 7-5

निकोला मिलोजेविक(सर्बिया,5) वि.वि  इवान नेडेल्को(रशिया)- 6-4, 6-1

सुमित नागल(भारत) वि.वि लुकास मिडलर(ऑस्टिलिया) 7-6(1),6-0

एन.विजय सुंदर प्रशांत(भारत) वि.वि आर्यन गोवीस(भारत) 6-3, 6-4

ब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन) वि.वि पेद्रो मार्टिनेझ(स्पेन) 6-2, 6-3

हुगो ग्रेनिअर(फ्रांस) वि.वि स्तुंग-ह्यु-यांग(तैपेई) 6-7, 6-0,6-0