केकेआरसाठी १०० सामने खेळणारा युसूफ पठाण गंभीरनंतरचा दुसराच खेळाडू…

0 70

कर्णधार गौतम गंभीर नंतर केकेआर संघासाठी १०० सामने खेळणारा युसूफ पठाण हा दुसराच खेळाडू ठरला. केकेआर आणि दिल्ली यांच्यातील सामना आज कोलकाता येथील मैदानावर सुरु झाला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 

बुधवारी पुण्याच्या विरुद्ध पुण्यातच खेळताना केकेआरसाठी १०० सामने खेळण्याचा विक्रम गौतम गंभीरने केला होता. तर त्याच्या पुढच्याच सामन्यात हा विक्रम युसूफ पठाणाने केला आहे. युसुफने आजपर्यंत १४३ सामन्यांत ३०. ८१ च्या सरासरीने २८६६ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १ शतक व १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

 

युसूफचा भाऊ इरफानने त्याला १०० व्या सामन्यासाठी शुभेच्छांचा ट्विट केला आहे.

 

केकेआरचा युसूफवरील हा खास व्हिडिओ  

 

Comments
Loading...
%d bloggers like this: