धोनी-रोहित शर्माला युसुफ पठाण पडला भारी

हैद्राबाद | शेवटचा चेंडू बाकी असताना काल हैद्राबादने दिल्लीवर रोमहर्षक विजय मिळवला. दिल्लीने दिलेले १६३ धावांचे आव्हान हैद्राबादने  १ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखुन जिंकले.

या विजयात अखेरच्या काही षटकांत युसुफ पठाणने १२ चेंडूत नाबाद २५ धावांची अफलातुन फटकेबाजी केली. त्यात त्याने २ षटकार आणि २ चौकार मारले.

वाचा- पृथ्वी शाॅची धमाकेदार कामगिरी सुरूच, आज आणखी एक नवा विक्रम

संघाला विजय मिळवुन देताना हा खेळाडू तब्बल १९ वेळा आयपीएलमध्ये नाबाद राहिला आहे. हा या स्पर्धेतील विक्रम आहे. त्याने या विक्रमात रविंद्र जडेजाची बरोबरी केली आहे.

धावांचा पाठलाग करताना युसुफ पठाण नाबाद राहिला असताना संघाला केवळ दोन वेळा विजय मिळवण्यात अपयश आले आहे.

आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक वेळा नाबाद राहिलेले खेळाडू-

१९- रविंद्र जडेजा
१९- युसुफ पठाण
१७- रोहित शर्मा
१६- गौतम गंभीर
१६- एमएस धोनी
१५- सुरेश रैना
१५- ड्वेन ब्रावो