डोप टेस्टमध्ये नापास झालेल्या युसूफ पठाणचे काय आहे म्हणणे?

बडोदा । भारतीय संघांचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणच्या डोप टेस्ट फेलची बातमी आज सकाळी आली आणि मोठी चर्चा सुरु झाली. परंतु यावर आता स्वतः पुढे येऊन युसूफने स्पष्टीकरण दिले आहे तसेच लवकरच संघात परतण्याचे संकेत दिले आहे.

युसूफ पठाणने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, “मी बीसीसीआयकडून आलेले पत्र पहिले आहे आणि मी बंदी घातलेले औषध घेतले आहे. मला थ्रोट इन्फेकशन झाले असल्याकारणाने मी ते चुकून घेतले. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून मी कशीही अशी कृती जाणूनबुजून करणार नाही हे ठरवले होते. मला माझा देश आणि बडोदा संघाकडून खेळायला मिळणे हे मोठी गोष्ट होती आणि मी त्या दोन्ही गोष्टींचा कधीही अपमान होणार नाही असेच कायम वागलो आहे. “

“मी माझे चाहते, बडोदा क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला वचन देतो की माझ्याकडून असे कृत्य पुन्हा होणार नाही. यापुढे मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कधीही कोणतेही बंदी असलेले औषध घेणार नाही. मी याबद्दलची बीसीसीआयची ध्येयधोरणे नक्की पाळेल. “

“मला विश्वास आहे की बीसीसीआय माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा खेळायची संधी देईल. मला विश्वास आहे की १४ जानेवारी नंतर माझी जेव्हा बंदी उठवली जाईल त्यानंतर मला पुन्हा क्रिकेट खेळायला मिळेल. “

युसूफ पठाणचे प्रसिद्धी पत्रक: