युवा दौड स्पर्धा: नवीन, क्रांती यांनी जिंकली शर्यत

पुणे। नवीन हुड्डा आणि क्रांती नवले यांनी क्रीडा भारती पुणे महानगरच्यावतीने आयोजित युवा दौड शर्यतीत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात बाजी मारली. पुरुष गटात नवीन हुडाने याने १२ किलोमीटर अंतराची शर्यत ३८ मिनिटे ४५.९ सेकंदांत पूर्ण करून पहिला क्रमांक मिळविला. गणेश जाधव (३९ मि. ५६.७ से.) आणि निकेत कडू (४० मि. ३२.८ से.) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. महिला गटात क्रांती नवले हिने ६ किलोमीटर अंतराची शर्यत २९ मिनिटे ३४.१ सेकंदांत पूर्ण केली. आयुषा बोरा (३३ मि. २३.४ से.) आणि सोनल तुपकर (३५ मि. ३२.७ से.) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.

स. प. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या शर्यतींना प्रारंभ झाला. युवा दौडमध्ये वयोगटानुसार दीड किलोमीटर, ३ किलोमीटर, ४ किलोमीटर, ६ किलोमीटर, ८ किलोमीटर व १२ किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रणिती टिळक, श्रीकृष्ण चितळे, राजीव सहस्त्रबुद्धे, राजन गो-हे उपस्थित होते. पारितोषिक वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, डॉ. शरद कुंटे, अ‍ॅड. एस.के. जैन, स्पर्धा प्रमुख प्रदिप अष्टपुत्रे, माऊली मामिळा, दिपक शेंडकर, विजय राजपूत, विजय हर्षे, विजय पुरंदरे यांच्या हस्ते झाले.

निकाल :
पुरुष (खुला गट) :
१२ किलोमीटर – नवीन हुड्डा (३८ मि. ४५.९ से.), गणेश जाधव (३९ मि. ५६.७ से.), निकेत कडू (४० मि. ३२.८ से.).

महिला :

६ किलोमीटर – क्रांती नवले (२९ मि. ३४.१ से.), आयुषा बोरा (३३ मि. २३.४ से.), सोनल तुपकर (३५ मि. ३२.७ से.).

१९ वर्षांखालील मुले : ८ किलोमीटर – ओंकार रत्नोजी (२८ मि. २३.९ से.), गणेश कळपे (३२ मि. ५४.१ से.), सौरभ धुमाळ (३३ मि. २३.२ से.). मुली – ४ किलोमीटर – वृषाली उत्तेकर (१७ मि. १२.३ से.), आकांक्षा गायकवाड (१७ मि. २३.७ से.), सिया मोडक (१९ मि. २१.५ से.)

१४ वर्षांखालील मुले : ३ किलोमीटर – साईराज कोळपे (१३ मि. २३.६ से.), कर्ण वाघळे (१३ मि. ५५.८ से.), गौरव भोसले (१४ मि. ३२.५ से.). मुली – तनया चौधरी (१७ मि. २३.४ से.), मनाली रत्नोजी (१७ मि. ५७.२ से.), लता डोळे (१९ मि. ५४.२ से.)

१२ वर्षांखालील मुले : १.५ किलोमीटर – रोहित वर्मा (६ मि. २३.१ से.), विनायक राजेशिर्के (६ मि. ५६.२ से.) आकाश साळुंखे (८ मि. १२.८ से.). मुली – किरण मारवाड (८ मि. २३.१ से.), मयुरी पंचावरे (१० मि. २.१ से.), वेदिका पुजारी (१० मि. ३४.२ से.).