युवराज सिंग मारतोय बीसीसीआयच्या ऑफिसच्या चकरा !

सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे युवराजला जर हे पैसे लवकर मिळाले नाही तर तो सर्वोच न्यायालयात दाद मागणार आहे.

भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगने काही काळ आधी एक जाहिरात केली होती ज्यात तो असे म्हणतो ” जो पर्यंत माझी बॅट चालत आहे तो पर्यंत मी चालतोय, एकदा का माझी बॅट चालायची थांबली की …” या जाहिराती प्रमाणेच काहीशी वेळ आता भारताच्या या २०११ विश्वचषकाच्या मालिकावीरावर आली आहे.

गेले १८ महिने झाले युवराज सिंग बीसीसीआयच्या ऑफिसच्या चकरा मारत आहे. बीसीसीआयने युवराज सिंगला ३ कोटी रुपये देणे आहे. फक्त युवराजच नाही तर युवराज सिंगची आईसुद्धा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना फोन करत आहे.

युवराज सिंग हे जे पैसे बीसीसीआयकडे मागत आहे ते म्हणजे भारतासाठी खेळताना युवराजला दुखापतग्रस्त झाली आणि त्यामुळे त्याला २०१७ च्या आयपीएलचे काही सामने खेळता आले नाही. बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार हे पैसे मागणे योग्य आहे. युवराज सिंगने सनरायाझर्स हेंद्राबाद संघाकडून ७ सामने खेळले नाहीत.
काही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे युवराजला जर हे पैसे लवकर मिळाले नाही तर तो सर्वोच न्यायालयात दाद मागणार आहे.

युवराजने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकार्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत आणि त्याची आईही युवराजच्या वतीने त्यांना कॉल करीत आहे. युवराजचा सनरायझर्स संघातील सहकारी आशिष नेहरा ही पाच सामन्यांना मुकला होता पण त्याला त्याचे पैसे मिळाले आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे युवराजला अजूनही मोबदला मिळाला नाही.

असे बीसीसीआयचा एक पदाधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला.