युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले आहे.

गिल भारतीय संघात लवकरच स्थान मिळवेल, असे काही दिवसांपूर्वीच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने म्हटले होते. त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. युवराज 2019 च्या विश्वचषकानंतर गिल भारतीय संघात येईल, असे म्हटला होता. मात्र त्याआधीच गिलची भारतीय संघात निवड झाली आहे.

युवराज म्हणाला होता की “गिल हा एक चांगला फलंदाज असून भारतीय संघासाठी खूप काळ खेळण्याची संधी आहे. मात्र त्याला त्याची कामगिरी उत्तम ठेवावी लागेल. तो 2019चा विश्वचषक झाल्यावर नक्कीच संघात आपले स्थान निर्माण करेल.”

युवराज आणि गिल पंजाब संघाकडून एकत्र खेळले आहेत.

मागील वर्षी न्युझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक भारताने जिंकला होता. यामध्ये गिलने 104.50च्या सरासरीने 418 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्याने 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. यात त्याने तमिळनाडू विरुद्ध मोहालीत 268 धावांची द्विशतकी खेळी केली.

युवराज सिंगप्रमाणेच दिनेश कार्तिकनेही गिल भारतीय संघाकडून खेळू शकतो असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडली अशी घटना

Video: जेव्हा यजुवेंद्र चहल घेतो रोहित शर्माची मुलाखत!

केएल राहुल ऐवजी निवड झालेल्या शुबमन गिलबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?