युवराज पुन्हा एकदा अपयशी, या कारणामुळे नाही मिळणार संघात स्थान

भारतीय संघाची २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड बरोबर वनडे आणि टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेच्या निवडीसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने एनसीए, बंगळुरू येथे यो यो फिटनेस टेस्ट दिली. या टेस्टमध्ये पुन्हा एकदा युवराज अपयशी ठरला आहे.

भारतीय संघात यापुढे निवड होताना कौशल्य हा एकमेव पात्रता असणार नाही याचे स्पष्ट संकेत निवास समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. संघात निवड होण्यासाठी फिटनेसला प्राधान्य राहणार असून त्यांनतर कौशल्याचा विचार केला जाणार आहे. यामुळेच आता भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल तर ही यो यो फिटनेस टेस्ट पार करावी लागेल.

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही नुकतीच ही टेस्ट दिली. त्यात त्याने उत्तम गुण मिळवत ही टेस्ट यशस्वी पार केली. याआधी सुरेश रैनाचीही टेस्ट झाली होती. तोही यात अपयशी झाला होता.

त्याचबरोबर चेतेश्वर पुजारानेही युवराज बरोबर ही टेस्ट दिली होती. त्याने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. तर युवराज आता पंजाबकडून रणजी सामन्यात खेळेल.