निवड समिती अध्यक्षांनी सांगितले युवराजला टी२० संघात स्थान न देण्याचे कारण

मुंबई । काल भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकवेळ कारकीर्द गाजवलेल्या युवराज सिंगला मात्र संघात स्थान देण्यात आले नाही.

याबद्दल निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी युवराज सिंगच्या फिटनेसवर बोट ठेवले आहे.

“युवराज सिंगला फिटनेस नसल्यामुळे वगळण्यात आले आहे. शिवाय तो आजकाल जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नाही. ” असे प्रसाद यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कालच युवराजने सांगितले होते की तो यो-यो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असून यापूर्वी तो यात तीनवेळा फेल झाला होता.

श्रीलंका संघाविरुद्ध २० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वनडे मालिकेप्रमाणे याही मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

या संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

संघ: रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेन्द्र चहल, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थंपी, जयदेव उनाडकत