म्हणून पंतप्रधान मोदींनी लिहिले युवराज सिंगला पत्र !

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला काल केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. आजपर्यँत कॅन्सरग्रस्तांसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज म्हणजे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र.

मोदींनी आपल्या पत्रात युवराज समाजासाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले आहे. युवी कॅन हे फॉउंडेशन करत असलेले काम हे कौतुकास्पद असल्याचंही मोदी पुढे म्हणाले.

मोदींनी युवराज सारख्या एका दिग्गज खेळाडूने कॅन्सरवर मात करून केलेल्या कामाचे कौतुक करताना तू लोकांसाठी एक मोठा आदर्श असल्याचं म्हटलं आहे.

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर ?
युवुई कॅन फॉउंडेशन हे युवराज सिंगने जुलै २०१२ साली कॅन्सरग्रस्त लोकांसाठी सुरु केलेलं फॉउंडेशन आहे. युवराजला स्वतःलाही ही आजार झाला होता. या आजारामुळे युवराज बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता. या काळात युवराज सिंग अमेरिकेत उपचार घेत होता. तो महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंगच्या कॅन्सर लढ्यामुळे प्रभावित होऊन स्वतःही हे काम करू लागला. त्याच्या ट्विटर हॅन्डलचे नावही @YUVSTRONG12 हे लान्स आर्मस्ट्रॉंगच्या कार्याला प्रभावित होऊन घेतलेले आहे.