वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या रोहित शर्मालाच युवराजने खडसावले

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज (12 डिसेंबर) त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रोहित शर्मानेही त्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

नुकत्याच अॅडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून रोहितने कसोटीमध्ये पुनरागमन केले. मात्र त्याने फलंदाजीत निराशा केली. याचाच फायदा घेत युवराजने त्याच्या ट्विटला उत्तर दिले.

रोहितने युवराजला ‘सुपरस्टार’ म्हणत त्याच्या सोबतचा आयपीएलमधील युवराजने त्याची मान पकडलेला फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याला युवराजनेही ‘तू परत 37 धावा करून बाद झाला तर मी परत तुझी मान पकडणार’ असे उत्तर दिले आहे.

रोहितने एक वर्षानंतर कसोटीमध्ये संघात पुनरागमन करताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात 37 तर दुसऱ्या डावात 1 धाव अशी खेळी केली होती. यावेळी तो 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या सामन्यात तीन षटकारही मारले होते. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला.

मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहित उत्तम फलंदाजी करतो. मात्र त्याचे कसोटीमध्ये निराशाजनक कामगिरी सुरू आहे. जर असेच सुरू राहिले तर त्याच्याजागी अष्टपैलू हनुमा विहारी संघात येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

दुसऱ्या कसोटी सामन्यात हे खेळाडू टीम इंडियाकडून येणार सलामीला

एकवेळ मुंबईकडून आयपीएल गाजवणार खेळाडू यावर्षी आयपीएल खेळणारच नाही

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप