…म्हणून युवराज सिंगच्या संघाने दिला बसमध्ये चढण्यास नकार

कॅनडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये नुकताच एक विवाद समोर आला आहे. 7 ऑगस्टला मॉन्ट्रियल टायगर्स  आणि टोरंटो नॅशनल या संघाच्या खेळाडूंनी वेतन न मिळाल्याने बसमध्ये चढण्यास नकार दिला होता.

याची माहिती पीटर डेल पेना नावाच्या एका पत्रकाराने ट्वीट करुन दिली होती. युवराज सिंग कर्णधार असलेल्या टोरोंटो नॅशनस आणि जॉर्ज बेली कर्णधार असलेल्या मॉन्ट्रियल टायगर्स यांच्यातील सामना 7 ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सुरु होणार होता.

पण खेळाडूंनी मैदानात घेऊन जाणाऱ्या बसमध्ये चढण्यास नकार दिल्याने सामना सुरु होण्यासाठी 2 तास उशीर झाला.

याबद्दल पीटर यांनी ट्विट केले होते की ‘सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे मॉन्ट्रियल टायगर्स  आणि टोरंटो नॅशनलच्या खेळाडूंनी बसमध्ये चढण्यास नकार दिला कारण त्यांना त्यांचे वेतन मिळलेले नाही. बस एका तासापूर्वी सुटणार होत्या. सामन्याला 75 मिनिटांत सुरुवात होणार आहे परंतु खेळाडू मैदानात पोहचलेले नाहीत.’

या प्रकरणाबाबत ग्लोबल टी20 कॅनडा लीगच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन ट्विट करण्यात आले होतो की काही तांत्रिक अडचणींमुळे सामना उशीरा सुरु होईल. तसेच 20-20 षटकांचा पूर्ण सामना होईल.

यानंतर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आले की सामन्याला उशीर झाला कारण खेळाडू, ग्लोबल टी20 कॅनडा लीग आणि संघमालक यांच्यात काही समस्या निर्माण झाल्या होत्या.

तसेच यात प्रायोजक, प्रसारक आणि जगभरातील कोट्यावधी चाहत्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफीही मागण्यात आली.

या प्रकरणामुळे उशीर झालेल्या या सामन्यात टोरोंटो नॅशनल संघाने 35 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टोरोंटो नॅशनल संघाचा नियमित कर्णधार युवराज दुखापतीमुळे खेळला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

१९ वर्षीय ‘द्विशतकवीर’ शुबमन गिलने गंभीरच्या १७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला दिला धक्का

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का!