निवृत्तीनंतर या गोष्टी करणार युवराज!

भारताचा लढवय्या क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या निवृत्तीनंतरच्या योजनांबाबत खुलासा केला आहे. त्याने हा खुलासा करताना तो समालोचन मात्र करणार नाही हे स्पष्ट केले आहे.

स्पोर्ट्सस्टार लाईव्हशी बोलताना युवराजने निवृत्तीनंतर त्याचे आयुष्य कसे असेल याबद्दल सांगितले. तो म्हणाला, ” समालोचन हे माझे क्षेत्र नाही. कॅन्सरग्रस्तांसाठी म्हणजेच युवी कॅन फौंडेशनसाठी पुढे मी काम करेल. मला तरुण मुलांना पाठिंबा द्यायला आवडतो. आत्ताच्या नवीन पिढीशी संवाद साधायला आवडते. प्रशिक्षण देणेही माझ्या मनात आहे. मला वंचित मुलांना शोधून त्यांच्या खेळाकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे आहे. खेळाप्रमाणेच शिक्षणही महत्वाचे आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे महत्वाचे आहे. खेळ हा शिक्षणामध्ये अडथळा व्हायला नको.”

याबरोबरच युवराजने अजून काही वर्ष क्रिकेट खेळणार असल्याचे संकेत दिले आहे. तसेच तो अजूनही २ ते ३ आयपीएल खेळणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

युवराज सध्या पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असून त्याचा संघ साखळी फेरीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे. तसेच युवराज जून २०१७ पासून भारतीय संघाबाहेर आहे.