चहल ठरला २०१७ मध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू

भारताचा स्टार खेळाडू युझवेन्द्र चहलने सध्या सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध टी२० मालिकेत पहिल्या सामन्यात तिसरी विकेट घेऊन टी-२० मध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

श्रीलंका विरुद्ध सामन्यात चहलने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात फक्त २३ धावा देऊन ४ बळीही घेतले. तर त्याने यावर्षी टी२० मध्ये १९ बळी घेऊन यावर्षीचा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू बनला आहे.

त्याने अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानला पिछाडीवर टाकले . राशिद खानने यावर्षी १७ बळी घेतले. तो या वर्षी सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू आहे.

सध्या सुरु असलेल्या टी२० मालिकेत पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ९३ धावांनी विजय मिळविला. तर दुसरा टी२० सामना आज संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.