इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाने असा अनोख्या प्रकारे केला सराव, पहा व्हिडिओ

2019 विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी भारतीय संघ बुधवारी(22 मे) इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर लगेचच गुरुवारी भारतीय संघाने सरावाला देखील सुरुवात केली आहे. त्यांच्या सराव सत्रातील काही फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यातील एका व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघाने काहीवेळ सराव सत्रामध्ये फुटबॉल खेळला. तसेच त्यानंतर त्यांनी बीब कॅचिंग हा एक वेगळा खेळ खेळूनही सराव केला. या खेळाचे नियम भारताचा युजवेंद्र चहलने या व्हिडिओमध्ये सर्वांना सांगितले आहेत.

त्याने सांगितले, ‘या खेळामध्ये सर्वांना थोडे पळावे लागते. यामध्ये सर्वांकडे एक बीब असेल आणि 2 मिनीटाची एक फेरी होईल. यावेळी तूम्हाला मागून एकमेकांचे बीब काढायचे आहेत. ज्याच्याकडे सर्वात जास्त बीब असतील तो जिंकेल आणि ज्याच्याकडे नसतील तो हरेल.’

या विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी 24 मे ते 28 मे या कालावधीत सराव सामने होणार आहेत. या कालावधीत सर्व सहभागी संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना 25 मे ला न्यूझीलंड विरुद्ध तर दुसरा सराव सामना 28 मे ला बांगलादेश विरुद्ध होणार आहे.

त्यानंतर 30 मेपासून विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

आयसीसी विश्वचषक 2019चे भारताचे सामने-

25 मे, 2019 – भारत विरुद्ध न्यूझीलंड (पहिला सराव सामना)

28 मे, 2019 – भारत विरुद्ध बांगलादेश (दुसरा सराव सामना)

5 जून, 2019 –  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

9 जून, 2019 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

13 जून, 2019 – भारत विरुद्ध न्यूझीलंड

16 जून, 2019 – भारत विरुद्ध पाकिस्तान

22 जून, 2019 – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

27 जून, 2019 – भारत विरुद्ध विंडीज

30 जून, 2019 – भारत विरुद्ध इंग्लंड

2 जुलै, 2019 – भारत विरुद्ध बांगलादेश

6 जुलै, 2019 – भारत विरुद्ध श्रीलंका

उपांत्य फेरी – 

पहिला उपांत्य सामना – 9 जुलै

दुसरा उपांत्य सामना – 11 जुलै

अंतिम सामना- 14 जुलै

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

२०१९ विश्वचषकात हे संघ गाठतील उपांत्य फेरी, सचिन तेंडुलकरने वर्तवला अंदाज

विश्वचषकातही हवी आयपीएल प्लेऑफसारखी पद्धत – रवी शास्त्री

विश्वचषकाआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला दिला खास सल्ला…