वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान

युजवेंद्र चहल हा मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघात आपले स्थान टिकावून आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. मात्र चहलला कसोटी संघात अजून स्थान मिळवण्यात यश आलेले नाही.

चहलने 29 प्रथम दर्जाचे सामने खेळले असून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहत आहे. आॅस्ट्रेलिया अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघाविरूद्धच्या चार दिवसीय सामन्यात तो भारत अ संघाकडून खेळला होता. त्यामुळे त्याला विडिंजविरूद्ध संघात स्थान मिळेल असे वाटले होते.

प्रथम श्रेणी क्रिकेट चहल सध्या जास्त खेळलेला नसून त्याने त्याने प्रथम श्रेणी क्रिकेमधील त्याचा शेवटचा सामना डिसेंबर 2016 मध्ये खेळला आहे.

स्टारस्पोर्ट्स लाईव्हशी बोलताना चहल म्हणाला की ”अर्थातच मलाही कसोटीमध्ये खेळण्याची इच्छा आहे. भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप, जडेजा आणि अश्विन सध्या सातत्यपुर्ण कामगिरी करत आहेत. त्यामुळे मला संधीची वाट पाहवी लागेल”.

पुढे बोलताना चहल म्हणाला की ”भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असून तुम्ही जर चांगली कामगिरी केली नाही तर दुसरा कुणीतरी तुमची जागा घेण्यासाठी सज्ज असतो. त्यामुळे आपण सतत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहतो”.

महत्वाच्या बातम्या-