पहा: धोनीने सोडली स्टंपिंग संधी

बेंगलोर । भारताचा युवा फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल आता सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत भलत्याच फॉर्मममध्ये आहे. चहलने रवींद्र जडेजा सारख्या अनुभवी गोलंदाजांच्या मागे सारत संघात स्थान मिळवले आहे. या मालिकेत भारताकडून तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

मालिकेतील बाकी सामन्यांप्रमाणे आजच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही, या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण सामन्यात एक असा क्षण आला जेव्हा त्याने सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचला आपल्या फिरकी गोलंदाजीने चकवले पण त्यावेळी स्वतः धोनीला ही तो चेंडू कळला नाही.त्याकडून स्टंपिंगची संधी हुकली.

पुढे जाऊन फिंचने ९४ धावांची मोठी खेळी केली. फिंच आणि वॉर्नर जोडीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने मोठा स्कोर उभा केला.

https://twitter.com/Cricvids1/status/913339871229386752

पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत ३-० ने आघाडीवर आहे. आज चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी निवडून ५ बाद ३३४ अशी मजल मारली आहे.