Album : झहीर- सागरीकाच्या एंगेजमेंटला दिग्गजांची हजेरी..

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेता सागरिका घाटगे यांची मंगळवारी रात्री एका आलिशान कार्यक्रमात एंगेजमेंट झाली. क्रिकेटर आणि बॉलीवूड अभिनेत्री हे एकमेकांचे जीवासाठी होण्याची ही काही पहिलीच वेळ नसली तरी त्यात झहीर- सागरीकाच्या नावाने आणखी एक जोडी जोडली गेली.

या कर्यक्रमाला चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजमंडळींनी हजेरी लावली होती. त्याची ही क्षणचित्रे…

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या कार्यक्रमाला पत्नी अंजलीसह उपस्थित होता. PC: The Indian Express

 

 

 

 

भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा बरोबर या कार्यक्रमाला आला होता. PC: The Indian Express

 

 

 

 

क्रिकेटपटू रोहित शर्मा पत्नी रितिका बरोबर या कार्यक्रमाला उपस्थित होता. PC: The Indian Express
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि अजित आगरकर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. PC: Twitter