साखरपुड्यानंतर झहीर खानने बदलला आपला लुक!
आयपीएल दिल्ली संघाचा कर्णधार असलेल्या झहीर खानने आपला नवीन लुक कालच ट्विटरवर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. २४ एप्रिल रोजी भारताच्या या माजी वेगवान गोलंदाजाचा साखरपुडा अभिनेत्री सागरिका घाटगेसी झाला आहे. पूर्ण आयपीएलमध्ये झहीर हा दाढीमध्ये दिसत होता. परंतु त्याने काल #breakthebeard हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर एक नवीन विडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने पूर्ण दाढी काढून टाकली आहे.
Is a fuzzy beard your nightmare?Well why fear it when you can just break it. Presenting my #BreakTheBeard #timetraveller look pic.twitter.com/SXRJREm3Vh
— zaheer khan (@ImZaheer) May 18, 2017
सध्या #breakthebeard हा नवीन ट्रेंड असून आयपीएलमधील बरेचशे खेळाडू त्यांचा विडिओ शेअर करत आहे. त्यात रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे यांनीही तो विडिओ शेअर केला आहे. विराटने असं करू नये याची ताकीदच अनुष्काने इंस्टाग्रामवर एका कंमेंटमध्ये केली होती.
सध्या दिल्ली आयपीएलमधून बाहेर पडली आहे. त्यात झहीरचा आताच साखरपुडा झाला आहे. त्यानंतर त्याने हा नवीन लुक ठेवला आहे.
सागरिका घाटगेनेही दोघांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने ह्या अनोळखी माणसाची घरवापसी झाल्याचं म्हटलं आहे. झहीरने #breakthebeard चांगलं केल्याचंही ती पुढे म्हणते.