झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : कधी, कुठे बघायचे सामने? सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हे वाचा…

भारताच्या स्वातंत्र्योत्तर ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम विजयी पताका फडकावली ती खाशाबा जाधव या मराठमोळ्या कुस्तीवीराने! सुरुवातीपासूनच कुस्ती या अस्सल मातीतल्या रांगड्या पारंपरिक खेळाला महाराष्ट्राने मोठे महत्त्व दिले आहे. आता हीच परंपरा झी समूह अभिमानाने पुढे नेत आहे. कुस्ती या खेळाला नवीन उभारी देण्यासाठी खास झी टॉकीजने ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’चे आयोजन केले आहे. या निमित्ताने आता मातब्बर कुस्तीवीरांची फौज एकमेकांसमोर लढताना दिसणार आहे. ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ मध्ये राहुल आवारे, किरण भगत , उत्कर्ष काळे यांसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू खेळणार आहेत हे विशेष.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलबद्दलची सर्व माहिती थोडक्यात:

दंगलीत कुठले संघ आहेत?

या अनोख्या स्वरूपातील दंगलीत वीर मराठवाडा, पुणेरी उस्ताद, कोल्हापुरी मावळे, विदर्भाचे वाघ, मुंबई अस्त्र आणि यशवंत सातारा असे सहा संघ आहेत.

सामने कधी आणि कुठे खेळले जाणार?
कुस्तीच्या महासंग्रामाचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या ‘श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम’ (बालेवाडी स्टेडियम) येथे रंगणार आहे. यशवंत सातारा आणि कोल्हापुरी मावळे यांच्यातील सामन्यापासून या स्पर्धेची सुरूवात होणार आहे.

सर्व सामने कुठे बघता येतील?
झी महाराष्ट्र कुस्ती दंगल हा कुस्तीचा महासंग्राम २ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून त्यातील सर्व सामने फक्त आणि फक्त झी टॉकीजवर बघता येईल.

किती वाजता हे सामने बघता येतील?
पहिल्या सामन्याचे लाइव्ह कव्हरेज झी टॉकीजवर संध्याकाळी सहाला सुरू होणार असून दुसरा सामना रात्री आठपासून रंगेल.

तिकिटे कुठे मिळतील?
कुस्तीचा हा नवा वैभवकाळ स्वतःच्या याची देही याची डोळा अनुभवायचा असल्यास paytm आणि insider.in वरून सर्व सामन्यांची तिकिटे ऑनलाइन बूक करता येतील. तसेच बालेवाडी स्टेडियमवरही तिकिटांची काऊंटर्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !

गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल

ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय

भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा