नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम

मुंबई | येथे आज झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीग स्पर्धेतील संघ तसेच खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. त्यात आज ६ संघांच्या नावाची घोषणा झाली.

यात अनिभेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सई ताम्हनकर, दिग्दर्शक नागराज मंजूळेसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी संघ विकत घेतले.

२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१८ या काळात पुण्यातील बालेवाडी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. यात यात १२८ खेळाडू ६ संघांकडून खेळताना दिसतील.

या स्पर्धेतील ६ संघ आणि त्यांचे संघमालक-

१. मुंबई अस्त्र- राजेश ढाके

२. पुणेरी उस्ताद- शांताराम माने आणि परितोष पेंटर

३. विर मराठवाडा- नागराज मंजूळे

४. विदर्भाचे वाघ- स्वप्निल जोशी

५. कोल्हापूरी मावळे- सई ताम्हनकर

६.यशवंत सातारा- पुरुषोत्तम जाधव

महत्त्वाच्या बातम्या:

वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ

कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?

एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम