झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये राहुल आवारे पुण्याच्या संघात

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये पुणेरी उस्ताद संघ पुणेरी उस्ताद या संघाचे संघमालक हे शांताराम मानवे व परितोष पेंटर आहेत. झी महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेता राहुल आवारे पुणेरी उस्ताद संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

दिल्लीचा खेळाडू विनोद कुमार ७.५ लाख रुपयात पुणेरी उस्तादने आपल्या संघात घेतलं आहे. पैलवान विजय चौधरी व महिला गटात विश्रांती पाटील यांचा संघात सहभाग आहे.

पुणेरी उस्ताद मुख्य संघ-
१) विश्रांती पाटील – ३ लाख (५५ किलो)
२) सौरभ पाटील (५७ किलो)
३) राहुल आवारे – ८ लाख (६५ किलो)
४) विनोद कुमार – ७.५ लाख (७४ किलो)
५) हनुमंत पुरी – ४ लाख (८६ किलो)
६) विजय चौधरी – ८ लाख (८६+ किलो)

राखीव संघ-
१) अंजली पाटील (५५ किलो)
२) पंकज पवार (५७ किलो)
३) प्रीतम खोत (६५ किलो)
४) किरण पाटील (७४ किलो)
५) अनिकेत खोपडे (८६ किलो)
६) गणेश जगताप (८६+ किलो)

महत्त्वाच्या बातम्या:

वीर मराठवाडा नागराज मंजुळेचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा संघ

‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ