पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अलेक्झांड्रा नेदिनोवा, पीआ कूक, कॅथरीना गेरलेचचा मुख्य फेरीत प्रवेश

स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेकला अग्रमानांकन

पुणे । नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत बल्जेरियाच्या अलेक्झांड्रा नेदिनोवा, स्लोव्हेनियाच्या पीआ कूक, जर्मनीच्या कॅथरीना गेरलेच या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत बल्जेरियाच्या दहाव्या मानांकित अलेक्झांड्रा नेदिनोवाने अव्वल मानांकित लातवियाच्या डायना मर्सीकेविचाचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली.

स्लोव्हेनियाच्या पंधराव्या मानांकित पीआ कूकने आठव्या मानांकित युक्रेनच्या मर्याना चेर्शोवाचा 6-3, 6-2 असा, तर रशियाच्या पाचव्या मानांकित याशिना इक्तेरिनाने ब्राझीलच्या क्रिस्टिना पॉलाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(2)असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची यादी आज जाहीर कारणयात आली. यामध्ये स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेकला अग्रमानांकन देण्यात आले आहे. तर, भारताच्या अंकिता रैना व चीनच्या जिया-जिंग लु यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:
कायलाह मॅकफी(ऑस्ट्रेलिया)(4)वि.वि.ऍनॅस्टेसिया नफिदोवा(यूएसए)(12) 6-1, 6-3;
मारिया मारफुतीना(रशिया)वि.वि.निका कुखर्चुक(रशिया) 6-3, 6-1;
पीआ कूक(स्लोव्हेनिया)(15)वि.वि.मर्याना चेर्शोवा(युक्रेन)(8) 6-3, 6-2;
मियाबी इनाऊ(जपान)(6)वि.वि.सु ची यु(तैपेई)1-6, 6-3, 6-1;
याशिना इक्तेरिना(रशिया)(5)वि.वि.क्रिस्टिना पॉला(ब्राझील)(14) 6-4, 7-6(2);
अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)(10)वि.वि.डायना मर्सीकेविचा(लातविया) 6-3, 6-2;
मरीम बोलकवडेझ(जॉर्जिया)(3)वि.वि. सेकुलीक सराह रिबेका(जर्मनी)(9)6-2, 6-2;
कॅथरीना गेरलेच(जर्मनी)वि.वि.ईडन सेल्वा(ग्रेट ब्रिटन)(13) 6-2, 6-2.

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(86),अंकिता रैना(भारत)(198), जिया-जिंग लु(चीन)(218), कारमान कौर थंडी(भारत)(223), ओल्गा दोरोशीना(रशिया)(228), डेनिझ खझानुक(इस्राईल)(245), कॅटी ड्युन(ग्रेट ब्रिटन)(253), क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड)(255).